एम.पी.एस.सी. चे अध्यक्ष मा.महोदय,श्री मोरे सर यांनी "यशदा" मधील भेटीदरम्यान आमच्या सोबत काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या. त्या अशा होत्या

एम.पी.एस.सी. चे अध्यक्ष मा.महोदय श्री मोरे सर यांनी "यशदा" मधील भेटीदरम्यान आमच्या सोबत काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या. त्या अशा होत्या (दिनांक  ४ oct 2015)
१.अधिकारी हा प्रामाणिक, योग्य, प्रभावशाली, पारदर्शी, लोकांच्या प्रती चांगला भाव असणारा, लोकांचे प्रश्न सोडवणारा, सामाजिक बांधिलकीची जाणिव असणारा असणारा असावा.
२.आयोगाचे कामकाज अतिशय पारदर्शी असुन परीक्षार्थीनी कोणत्याही टप्प्यावर कसल्याही अमिषाला बळी पडु नये.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये.
३)आयोग हे नेहमी परीक्षार्थींचा जास्तीत जास्त त्रास कमी करण्यावर भर देते. आयोगाची भूमिका परीक्षार्थी केंद्रबिंदु मानुन ठरवली जाते.म्हणुन आयोग नेहमी विद्यार्थ्यांप्रती सकारात्मक असुन परीक्षार्थींनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं.अफवांवर विश्वास न ठेवला, १००% देण्यावर भर द्यावा.
आयोग कोणाचेही नुकसान न होवु देण्यासाठी काम करत आहे.
४)सरांनी मान्य केलं की CSAT ची काठिन्य पातळी जास्त आहे. त्यावर ते काम करत आहेत.
५)सध्याच्या शिक्षण पद्धतीमधुन चांगले विद्यार्थी निर्माण व्हावेत, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
६)परीक्षेत आकडेवारीवर आधारीत प्रश्न कमी करण्याचा आयोगाचा कल आहे पण प्रश्नपत्रिका काढणारे तज्ञ यांचा थोडा प्रभाव पडणे साहजिक आहे.
७) प्रश्न काढताना अधिकृत माहिती स्रोतांचा आधार घेतला जातो.त्यासाठी "एन.सी.ई.आर.टी. व राज्य शासनाच्या पाठ्यपुस्तकांचा संदर्भ दिला.
८)मुलाखतीत चांगल्या व आदर्श मूल्यमापनासाठी आयोग प्रयत्नशील आहे. त्यातील वैविध्य कमी करण्यावर भर आहे.
९)परीक्षाकेंद्रे, तारखा व निकाल यांना उशीर होण्यामागं आयोगाची इतर कारणं आहेत.यावर आयोगाचं नियंत्रण नसतं.पण आयोग याच्यात सुधारणा करण्यावर आयोग प्रयत्नशील आहे.
१०)"आयोग" हे वैधानिक मंडळ आहे, त्यामुळे कधीही अफवांवर विश्वास ठेवु नका.स्वत:वर विश्वास ठेवा.
११) परीक्षार्थींनी श्रीमंत होण्यासाठी हे क्षेत्र निवडु नये.हे समाज सेवे साठीचे क्षेत्र आहे. श्रीमंतीसाठी दुसऱ्या क्षेत्रे निवडावीत.
१२)समकालीन समस्यांची जाणीव असणारे अधिकारी हवेत.
१३)उमेदवारांना(परीक्षार्थींना) सामाजिक बांधिलकीची जाणीव  हवी.
१४)सध्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय.या तंत्रज्ञानाचा वापर लोकांसाठी कसा करता येईल? याची माहिती परीक्षार्थींना असायली हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हे सांगताना त्यांनी ते स्वत: टान्स्पोर्ट कमिशनर असतानाचे अनुभव सांगितले.
१५) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा प्रश्नपत्रिकेतील चुका कमी करण्यावर भर आहे. त्याबद्दल त्यांनी राजस्थान आयोगाच्या परीक्षेतील १०० प्रश्नातील ४० चुकांचा संदर्भ दिला.याउलट महाराष्ट्र आयोगाच्या कमाल चुका फक्त १०० पैक ४ च चुका असल्याचे नमुद केले.
१६) MultiCader  परीक्षेला प्रतिक्षा यादी लावता येणार नाही, हे ही सांगितलं.
१७)अधिकारी हा प्रामाणिक, योग्य, प्रभावशाली, पारदर्शी, लोकांच्या प्रती चांगला भाव असणारा, लोकांचे प्रश्न सोडवणारा, सामाजिक बांधिलकीची जाणिव असणारा असणारा असावा.
१८)एक आनंददायी बातमी अशी की,
पुढच्यावर्षीपासुन अजुन ५-६ सेवा वाढवल्या जाणार आहेत, त्यामुळे आपण अजुन जादा पोस्टस् (पदे) मिळण्याची आशा ठेवु शकतो.
१९) आयोगाच्या निवड पद्धतीत वशिलेबाजी चालतच नाही, त्यामुळे परीक्षार्थींनी त्यापासुन दुर रहावे.
२०)मुलाखतीत उमेदवाराशी केंद्रित व निगडीत प्रश्न विचारले जातात, उमेदवाराला क्रॉस करणारे, गोंधळात टाकणारे प्रश्न नसतात. त्यामुळे सकारात्मकतेने मुलाखतीला सामोरे जा.
वरील हे सारे मुद्दे मा.महोदय श्री. मोरे सरांच्या संभाषणातुन आलेले आहेत.
 
@वरिल मजकुरात कोणताही,बदल करुन अापले नाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास,कायदेशीर कारवाई होऊ शकते.याचे भान असावे.मी blog व्यतिरिक्त कुठेहि लिखान करत नाही.
वरिल मजकूर टाकण्यामागचा उद्देश -
१)हि एक sensitive post आहे.यामाध्ये कोणी बदल केल्यास याचे भयानक परिणाम होऊ शकतात.जसे कि एखादा चुकीचा संदेश देणारा मजकूर add होऊ नयॆ.
२)मागिल माझ्या post खाली काही माहाशयाने बदल करुन स्वतःचे नावाने post खपवल्या आणि स्वतःची advertise keli
3) यातुन स्पर्धा परीक्षा करणार्या विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे.
आपला मित्र,
अजित प्रकाश थोरबोले
परि. उपजिल्हाधिकारी.
http://ajitdc.blogspot.in

@माझे काहि लेख

MPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असा blog..कोणती पुस्तके वापरावी.अभ्यास कसा करावा.राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ साठी नियोजन कसे करावे.csat ची तयारी कसी करावी अाणि मुख्य परीक्षा चे audio notes.....खालील दिलेल्या link वर क्लिक करा

Ajitdc.blogspot.com
1)CSAT ची तयारी

2)राज्यसेवा पूर्व  परीक्षा २०१६ पुढील ४ महिने  अभ्यासाचे नियोजन कसे असावे

३)राज्यसेवा मुख्य परीक्षा audio नोट्स

4)राज्यसेवा पूर्व  परीक्षा २०१६ साठी तयारी  करणाऱ्या उमेदवारासाठी  
5)महाराष्ट्रात  होणार्या विविध स्पर्धा परीक्षा-राज्यसेवा,Forest,Agricuture,Engineerung PSI,STI,ASSISTANT, तलाठी,पोलिस,ग्रामसेवक आणि विविध  interview साठी उपयोगी "महाराष्ट्राची अार्थिक पाहणी" HIGHLIGHT स्वरूपात 

6)राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची 

Labels: