CSAT ची तयारी

CSAT ची तयारी



* राज्यसेवा (पूर्व ) परीक्षेत उमेदवारांची 'योग्यता 'तपासण्यासाठी या विषयाचा अंतर्भाव केलेला आहे.
* पूर्व परिक्षेत दोन्ही विषयास प्रत्येकी २००मार्कस असतात .परंतु CSAT  परिक्षेचे प्रश्न फिक्स  प्रकारचे असतात परंतु सामान्य अध्ययन  I पेपरमध्ये कोणतेही प्रश्न विचारले जातात त्यामुळे या विषयात सर्वाधिक मार्क पडू शकतात . त्यामुळे या वर दररोज ठरावीक वेळ देणे गरजेचे आहे.
* CSAT ला मराठीत 'सामान्य क्षमता चाचणी 'असेही म्हणतात .पूर्व परिक्षेत या विषयाला २०० मार्कासाठी ८० प्रश्न विचारले जातात.साधारणपणे  १ प्रश्नाला ९० सेंकद मिळतात.त्यामुळे अचुकता आणि वेळ याचा ताळमेळ बसवणे गरजेचे आहे.


* यामध्ये खालील विषय समाविष्ट होतात .
(1) Comprehension (आकलन क्षमता)
(2) Interpersonal skills including communication skills.(परस्पर संवादासह आंतर्व्याक्ती संवाद कौशल्ये)
(3) Logical reasoning and analytical ability. (तार्किक व विश्लेषण क्षमता)
(4) Decision – making and problem – solving. (निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण)
(5) General mental ability (सामान्य बौद्धिक क्षमता)
(6) Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level),                           Data interpretation(Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class X level)                                   (पायाभूत अंकगणित & माहितीचे पृथ्थकरण)
(7) Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level).(मराठी व इंग्रजी भाषिक आकलन कौशल्य)


* यामधील विषयात Comprehension म्हणजेच 'आकलन 'या विषयावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात . मागील तीन वर्षाच्या MPSC च्या पूर्व परिक्षेत ४५ते ५० प्रश्न या विषयावर विचारले गेले आहेत यातून त्यावर सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे .


* शालेय परिक्षामध्ये passage च्या धर्तीवर हा Comprehension आहे परंतु यांची काठिण्यपातळी व प्रश्नाचा प्रकार वेगळा आहे.
http://ajitdc.blogspot.in

* Comprehension मध्ये विचारले जाणारे passage  हे विविध विषयावर आधारित असतात जसे की , भूगोल , पर्यावरण, समाजशास्त्र ,अर्थशास्त्र , विज्ञान तंत्रज्ञान , तत्त्वज्ञान या विषयावर आधारित असतात . त्यामुळे सामान्य अध्ययन-१चा अभ्यास काळजीपूर्वक केला तर फायदा होतो . त्याच बरोबर विविध मराठी वर्तमानपत्रामधील संपादकीय लेख पुरवण्यामधील या विषयावर आधारित लेख वाचण्याचा नक्कीच फायदा होतो.
http://ajitdc.blogspot.in/

*  Comprehension सोडविताना तुमच्या वाचनाची गती अधिक असणे गरजेचे आहे परंतु गतीबरोबर त्या उताऱ्याचे आकलन चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे .सराव केल्याने 'गती' व 'आकलन' क्षमता वाढवता येऊ शकते यासाठी दररोज ३-४ उतारे सोडविणे गरजेच आहे . आपण कुठे चुकतो हे तपासायला हवे आणि त्यावर कार्य करायला हवे .
* उतारा सोडाविताना प्रथम उतारा काळजीपूर्वक , एकाग्रचित्ताने वाचा व महत्त्वाच्या शब्दाना , ओळींना , अधोरेखित करा . कोणत्याही परिस्थितीत प्रश्न अगोदर वाचू नका.


*  प्रश्न काळजीपूर्वक वाचा जसे की खालीलपैकी विधान तुम्हाला 'सत्य' की ' असत्य' ओळखायचे . त्यामुले त्याखाली अधोरेखित करा घाईघाईत उत्तरे देऊ नका .एकाग्रचित्ताने उतारा व त्याखालील प्रश्न वाचा .



* बरेच उमेदवार हे comprehension मध्ये मागे पडतात . काहीचे प्रश्नाची उत्तरे चुकतात , काहीचे वेळेचे नियोजन चुकते तर काही ना उतारा समजत नाही तर त्यांनी उताऱ्याचे वाचन म्हणजेच पर्यायाने आकलन एकाग्रपणे केले तर चुका कमी होतात व accuracy अचूकपणा वाढेल . दररोज सरावाने वेळेचे नियोजन करता येऊ शकते यासाठी वाचनाची गती वाढविणे गरजेचे आहे . उतारा समजण्यासाठी 'Reading between the lines 'वाचणे गरजेचे आहे .
उदा : उताऱ्यामध्ये जर कर्नाटकमध्ये वाघांची संख्या मध्ये भारतात पहिला क्रमांक येतो याचा अर्थ असा होतो
    १ : इतर कोणत्याही राज्यापेक्षा कर्नाटक मध्ये वाघांची संख्या जास्त आहे .
    २ :याचा अर्थ मात्र असा होत नाही की , वाघांची घनता कर्नाटकमध्ये जास्त आहे .
   ३ :याचा अर्थ असाही होत नाही की नर अथवा मादी वाघांची संख्या कर्नाटक मध्ये जास्त आहे .
  ४ :याचा अर्थ असाही होत नाही की कर्नाटकातील लोक वाघांची निगा चांगल्या प्रकारे राखतात.
              अशा प्रकारे 'Reading between the lines' वाचायला हवे .

* CSAT पेपरचा सराव करताना passages चे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत असतात .परंतु सोडविताना तुम्हाला जी भाषा सोपी वाटते त्या भाषेत उतारा सोडावा . काही वेळेस एखादा शब्द समजत नसेल तर भाषांतराच्या दुसऱ्या भाषेतून पहावा.
 





* सरावासाठी मागील UPSC, MPSC च्या CSAT च्या पेपरमधील उतारे CDS पेपरमधील उतारे , विविध प्रकाशनाच्या पुस्तकातील उताऱ्याचा आधार घ्या आणि दररोज improvement कर.
*साधारणत: एका उताऱ्यावर 5 प्रश्न विचारले जातात . एक उतारा 8 मिनीटात पूर्ण होणे गरजेचे आहे . त्याचप्रमाणेtimeलावून उतारे सोडवा .



* गणित , बुद्धिमत्ता ,अंकगणित या विषयावर साधारणत 25 ते 3Oप्रश्न विचारले जातात यातील एक - एक विषय घेऊनdaily सराव करा . त्याचबरोबर आणखी 4 महिने कालवधी असल्याने दुर्लक्ष न करता जरी हे विषय अवघड वाटत असले तरी त्यावर सतत प्रयत्न करून हे विषय सोपे बनवता येतील परंतु कसल्याही परिस्थितीत हे विषय optional वर टाकू नका .सरावाने व सकारात्मक विचाराने कृती केली तर कोणताही विषय सोपा होऊ शकतो .
* अंकगणित ,माहितीचे पृथ्थकरण यांची काठिण्य पातळी हे इयत्ता १०वी पर्यतची आहे त्यामुळे कोणतेही भिती न बाळगता त्या विषयाची daily तयारी काही तरी नवीन शिकायला मिळेल या भावनेने त्याचप्रमाणे परिक्षेत यश मिळवायचे आहे या प्रेरणेने करावे



*'Decision making' हा एक महत्त्वाचा विषय उमेदवारांना चांगले मार्क देऊ शकतो यावर साधारणत: 5 ते 7 प्रश्न विचारले जातात . याला सरावाने चांगले मार्क पडू शकतात.
* CSAT चे प्रश्न सोडविताना घाई अजिबात करू नका लक्षात घ्या ही पुस्तकाची परिक्षा नसून तुमच्या योग्यतेची परिक्षा आहे . त्यामुळे कोणत्या पुस्तकातून प्रश्न येतात यापेक्षा तुम्ही स्वतःला कशा तयार करता हे महत्त्वाचे आहे .


* CSAT साठी विविध classes तर्फे Test series आयोजित केल्या जातात त्या test series लावा कारण सराव होतो . त्याचबरोबर वेळेचे नियोजन जमते . आपण कोठे मागे पडतो ते माहित होते परंतु या सराव परिक्षेत आपण कुठे कमी पडतो त्यावर परिश्रम करायला हवे

* लक्षात घ्या एक - एक मार्क महत्त्वाचा आहे त्यामुळे नाशिबावर सोडू नका . जर एखादया प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर पुढील प्रश्नाकडे जावा परंतु कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या उत्तराचा पर्याय निवडू नका त्याचप्रमाणे त्या प्रश्नाकडे जो सोडविला नाही त्याकडे परत येऊ नका..
*CSAT च्या पेपर मध्ये       pre-plan जाऊ नका की , मी परीक्षेत अमुक एवढेच प्रश्न सोडविणार.तर परिक्षेच्या काठिण्यपातळीनुसार तुम्ही प्रश्न सोडवा . मागील ३ वर्षाच्या पश्नपत्रिकेनुसार 50 ते 65प्रश्न दरम्यान जर प्रश्नाचा attempt असला तरी पुरेसा आहे . सर्वच्या सर्व प्रश्न सोडविण्याची गरज नाही परिक्षेत मात्रsufficient attempt असावा माझ्या मते 60 ते 70 च्या दरम्यान अचूकतेचा attempt योग्य राहील .
#CSATचा पेपर सोडविताना ही काळजी घ्या ...
  १ :stable mind असायला हवे.                     
  २ : कोणतेही दडपण असू नये
  ३ : कोणत्याही बाह्य गोष्टी (गोंगाट, परिक्षा हॉलमधील चर्चा ) या मुळे disturb होऊ नका
  ४ : प्रथम परीक्षा पेपर सोडवताना decision making व नंतर Comprehension घ्या.
  ५ :घाई - गडबड न करता शांततेने पेपर सोडवा .
  ६ : वेळेचे भान ठेवा.
  ७. Silly  mistake टाळा.
  ८.दररोज सराव करा.
All the best!
Download in pdf format click here- DOWNLOAD

आपला मित्र,
अजित प्रकाश थोरबोले
परि. उपजिल्हाधिकारी.

@या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत जर या लेखाचा वापर इतर कोणी स्वतःच्या फायद्यासाठी,स्वतः लिहले आसे दर्शवण्याचा प्रयत्न   केला तर कायदेशीर कारवाई होऊ शकते.याची नोंद असावी

Labels: , ,