राज्यसेवा पूर्व  परीक्षा २०१६ पुढील ४ महिने  अभ्यासाचे नियोजन कसे असावे
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ पुढील ४ महिने अभ्यासाचे नियोजन कसे असावे.

१)परीक्षेला जेमतेम ४ महिने राहिले आहेत.आणि त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी ५ महिने कालावधी मिळणार आहे.तरी आता पूर्व परीक्षेवर भर द्यायला हवा.

२) अभ्यासाचे २५ मार्च पर्यंतचे नियोजन करून अभ्यास पूर्ण व्हायला हवा.म्हणजे शेवटच्या १५ दिवसात revision करता येईल.

३)पुढील १२० दिवसांच्या नियोजनात सर्व विषय पूर्ण करावयाचे असल्याने आपआपल्या विषयावरिल command चा विचार करून प्रत्येक विषयाला वेळ द्यायला हवा.जसे कोणाचे अर्थशास्त्र हा विषयावर पक्कड नसेल तर त्यावर जास्त लक्ष द्यावे लागेल.

http://ajitdc.blogspot.in

४)साधारणत; पेपर १ मध्ये चालु घडामोडी सोडून ६ विषय आहेत.म्हणजेच प्रत्येक विषयासाठी २० दिवस मिळतात.यात कमी-जास्त करुन तुमचं अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा.माझ्या मते एक विषय संपल्यानंतरच पुढिल विषय घ्या.जर एक विषय वाचन करून कंटाळा आलातर,तुम्ही चालू घडामोडी अथवा CSAT अथवा मागील पूर्ण केलेल्या विषयाची revision करु शकता.आणखी एक बाब म्हणजे अभ्यास करताना एकेक topic, syllabusप्रमाणे घ्या.जसे समजा तुम्ही १८५७ चा उठाव हा topic करत असाल तर प्रथम तो topic शालेय पुस्तकातुन करा आणि त्यानंतर संदर्भ पुस्तक grover अथवा बिपिन चंद्रा मधुन करा.त्यानंतर विविध sources मधून त्या topic वर आधारित प्रश्न सोडवा.

)चालु घडामोडी साठी मात्र दररोज ठराविक वेळ द्या.साधरणपणे एप्रिल २०१५ पासूनचे चालू घडामोडी करायला हवे.बदलत्या स्वरूपानुसार चालू घडामोडीचा अभ्यास करायला हवा.काही विषयाचा संबंध हा चालु घडामोडीवर आधारित असतो.त्यामुळे त्या विषयाला चालू घडामोडीचा touch द्यायला हवा.जसे कि polity मध्ये सध्या collegium system वर प्रश्न विचारला जाउ शकतो.

६)जो अभ्यास तुम्ही daily करता,त्याची त्याच दिवशी revision करा.आणि जेव्हा पण तुम्ही group मध्ये एकत्रित याल तेव्हा तुम्ही जॊ अभ्यास केला आहे तॊ SHARE करा.इतर फालतू गप्पागोष्टी पेक्षा ते कधीही चांगलेच.

७)study करताना तुमचे मन हे free असने गरजेचे आहे,त्यामुळे इतर problm निपटून अभ्यासाला लागा.

८)आपले आईवडिल खुप कष्ट करून आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी नाही पडणार याची काळजी घेतात,मग आपले पण कर्तव्य ठरते कि,त्यांच्या कष्टाला जागुन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे.यासाठी प्रयत्न करा.१००% द्या यश हातात आहे.

http://ajitdc.blogspot.in

९)मागील लेखात मी म्हटले होते कि अगोदर आलेले अपयश विसरून नव्याने सुरवात करा.त्याचप्रमाणे तुम्ही शून्यापासुन सुरवात करा.

१०)पूर्व परीक्षा ही basic knowledge ची कसोटी असल्याने त्यावर जास्त भर द्या,यासाठी मी सांगितलेल्या पुस्तकसुचीचा संदर्भ घ्या.पुस्तकसुची blog वर पहा.

राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची


११)प्रत्येक topic नंतर प्रश्न सोङवा कारण हि objective प्रकाराची परीक्षा आहे.जेवढे जास्तीतजास्त प्रश्न सोडवाल तेवढा तुमचा confidence वाढेल.

http://ajitdc.blogspot.in

१२)दररोज average ८-१० तास अभ्यास पुढील ४ महिने पुरेसा राहिल.काहि दिवशी तुमचा काहीच अभ्यास विविध कारणांमुळे होणार नाही तरी तुम्ही tension अजिबात घेऊ नका.सकारत्मकपणे विचार करून पुढील दिवशी तो study पूर्ण करा.

१३)अभ्यासाबरोबर मनाची स्थिरता पण असने गरजेचे आहे त्यासाठी दररोज meditation, jogging,exercise करायला हवा.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःशी संवाद साधायला हवा.जेणेकरून आपल्याला प्रगती करता येईल.लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षामध्ये खरी स्पर्धा तुमची स्वतःशीच आहे.

http://ajitdc.blogspot.in

१४)सध्या मोठया प्रमाणावर facebook आणि whatsapp चा वापर होत आहे.विविध study groups या माध्यमात सक्रिय आहेत.परंतु याचा मर्यादित आणि चांगला वापर होणे गरजेचे आहे.या study group वर अभ्यास कमी आणि इतर गोष्टी जास्त होताना दिसतात.ज्या प्रमाणात वेळ खर्च होतो त्या प्रमाणात output मिळत नाही.कुठून तरी outdated प्रश्न टाकले जातात आणि त्याची दिवसभर उत्तरे काहि जण देत असतात.अशा timepass करणाऱ्या group पासुन दुर राहावा.प्रश्न हे authentic sources मधून टाकले जातात त्यामुळे Internet वरील material पेक्षा authentic पुस्तके वापरा.जर एखादा मुद्दा चांगल्या प्रकारे एखाद्या Website वर दिला असेल तर जरुर त्या website बघा.उदा.mrunal.org,pib.nic.in,wikipedia etc
authentic sources ची सुची

१५)CSAT चा daily सराव करा.(यावर एक लेख लवकरच लिहणार आहे)

CSAT ची तयारी


१६)शक्यतो study दिवसा करा आणि रात्र जागरण टाळा.अवघड विषय जर तुम्ही दिवसा हातळले तर सोपे होऊन जातील.

१७) मोठया syllabus चे अथवा प्रचंड स्पर्धेचे अजिबात दडपण घेऊ नका.cool रहा.आत्मविश्वासपणे सातत्यपूर्वक प्रयत्न चालु ठेवा.

"Dont be serious but be sencere."

तुम्हाला study साठी ALL THE BEST!


आपल्या whatsapp group मध्ये मला add करा मोबाइल -9423035088
Pdf format मध्ये 

आपला मित्र,
अजित प्रकाश थोरबोले
परि. उपजिल्हाधिकारी.Labels: , ,