स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थी आणि सोशल मेडिया

स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थ्यांनी सोशल मेडियाचा  वापर कसा करावा ?
                                                                                                   - अजित   प्रकाश   थोरबोले
                                                                             परि.उपजिल्हाधिकारी

@या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत जर या लेखाचा वापर इतर कोणी स्वतःच्या फायद्यासाठी,स्वतः लिहले आसे दर्शवण्याचा प्रयत्न   केला तर कायदेशीर कारवाई होऊ शकते.याची नोंद असावी

Ø  आज मोठ्या प्रमाणावर सोशल मेडियाचा वापर वाढलेला आहे. आणि बदलत्या परिस्थतीशी जुळवुन घेण्यासाठी त्याची सध्याच्या स्पर्धेच्या  युगात गरज निर्माण झाली आहे. परंतु त्याचा मर्यादीत आणि विधायक कामासाठी वापर होणे गरजेचे आहे.

http://ajitdc.blogspot.com/

Ø  आज विविध प्रशासकीय कामामध्ये व्यवसायिक कामामध्ये सोशल मेडियाचा वापर वाढलेला आहे. स्पर्धा परीक्षा पण यातुन सुटलेले नाही. परंतु याचा वापर योग्य प्रकारे होण्याची गरज आहे. त्याचा वापर आपल्या कामापुरता मर्यादीत करावा त्याला सर्वस्व बनवायला नको. स्पर्धेच्या युगात focused असणे खुप गरजेचे आहे. जे उमेदवार focused study  करतात त्यांना हमखास यश मिळते. त्यामुळे सोशल मेडियातून काय घ्यावे आणि काय घेऊ नये? हे कळायला हवे. 

Ø  हे माहितीचे युग आहे. परंतु भरपुर माहिती असणाऱ्यापेक्षा योग्य आणि authentic माहिती असणारा आणि त्याचा योग्य प्रकारे वापर करणारा यशस्वी होते. उदा."Project tiger" बद्दल Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Project_Tiger) वर पण माहिती उपलब्ध आहे. परंतु पर्यावरण मंत्रालयाच्या project Tiger (http://projecttiger.nic.in/)या वेबसाईट वरील माहिती ही authentic मानले जाते त्यामुळे सोशल मेडियावर येणारी माहितीची सत्यता पडताळणे गरजेचे ठरते त्यामुळे facebook, whats app यावर येणार्या माहितीची सत्यता पडताळा अथवा कोणता source वापरायचे ते ठरवा

http://ajitdc.blogspot.com/


Ø  सध्या मोठ्या प्रमाणवर facebook  आणि whats app  वर स्पर्धा परीक्षा study group  सक्रिय आहेत. या ग्रुपवर जरूर join करा  परंतु खालील बाबी तपासून पहा.
1.       या ग्रुप वर परीक्षेच्य़ा स्वरुपानुसार मार्गदर्शन मिळते का ?
2.       जे प्रश्न या ग्रुपवर टाकलेले असतात त्या स्वरूपाचे प्रश्न सद्याच्या परीक्षेत विचारले जातात का ?
3.       या ग्रुपवर अभ्यासाव्यतिरीक्त इतर गोष्टी जशा की, जोक्स शेअर करणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मॅसेज, काही वादाचे विषय (अमिरखान प्रकरणासारखे) आणि त्यावरील चर्चा काही सामाजिक संघटनंचे जाहीरनामे आणि न संपणाऱ्याफालतु विषयावरील चर्चा तर होत नाहीत ना हे पहावे.
4.       आपण ज्या प्रमाणावर ज्या ग्रुपवर वेळ घालवटो त्यातून मिळणार output  पुरेसे आहे का ?
5.       नकारात्मक विचार प्रवृत्तीचा उमेदवाराच group तर नाही ना ?
6.       अशा ठिकाणी नवख्या उमेदवाराला study बद्दल योग्य मार्गदर्शन मिळते का ?
वरील बाबीची उत्तरे तपासून या group  वर चे सदस्य व्हा.

http://ajitdc.blogspot.com/

Ø  स्पर्धा परिक्षेची तयारी करताना  मनोहर भोळे सरांनी त्यांच्या ‘अभ्यास ते अधिकारी’ पुस्तकात  ‘ON’आणि ‘OFF’  ची अतिशय सुंदर संकल्पना मांडली आहे. ‘ सोशल मेडिया ’आणि अभ्यास यामध्ये ती तांतोतंत  लागु पडते.

Ø  Facebook वर ‘Likes’ आणि ‘comments’करण्यात वेळ वाया घालवू नका. स्पर्धा परीक्षेत खरा  तुमचा  कस लागतो एक-एक सेकंद महत्वाचा आहे आणि जो या वेळेचे महत्व समजेल, तोच या स्पर्धा परीक्षा मध्ये पुढे जाईल. ज्या वेळेस आपण likes अथवा comments  करत असतो त्यावेळेस आपण ज्यावर आपण likes  आणि comments  करतो नकळत आपण त्यामध्ये invole होतो आणि आपले लक्ष  study  मध्ये लागत नाही.तुम्हीच ठरवा तुम्हाला कुठे जायचे आहे?
Ø  साधारणत:  या परीक्षेत 21 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या संख्या जास्त आहे. या वर्गामध्ये सोशल मेडियाचे आकर्षण आणि वापरही जास्त असतो परंतु हा काळ पण त्यांना स्वतःचे करिअर घडविण्यासाठीचा उमेदिचा काळ असतो आपल्या व्यक्तिमत्वाला परिवक्वता आणण्याची ही योग्य वेळ असते आणि या वयात आपण चुकीच्या मार्गाकडे वळतो. ज्याचा परिणाम आपल्या करिअर वर होतो आपण वेगवेगळ्या विचार सरणीकडे झुकलो जातो आणि त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होतो या विचारसरणी सोशल मेडिया व्दारे आपल्याला प्रभावित करत असतात तुम्ही ठरवायचे आहे की, अभ्यास करून करिअर घडवायचे कि, कोणत्या तरी विचारसरणीचा भाग होऊन स्वतःला अधोगतीकडे घेऊन जायचे.माझे ऎका या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या नवीन उमेदवारांनी सोशल मेडिया पासून  दूर रहावे.

http://ajitdc.blogspot.com/

Ø  सोशल मेडियाचा सर्वाधिक चांगला वापर हा मुलाखतीच्या काळात होतो. यामध्ये facebook आणि whats app  वर ग्रुप तयार करता येऊ शकतात ज्यामध्ये झालेल्या मुलाखतीचे शेअरिंग, चर्चा, विविध विषयावर माहितीची देवाण-घेवाण, मुलाखतीची तंत्रे, त्याचबरोबर एखाद्या प्रश्नावरील विविध कोनातील उत्तरे याबाबतीत चर्चा, चांगल्या संदर्भसुचीची देवाणघेवाण केली जाऊ शकते याचा फायदा मला माझ्या मुलाखतीच्या वेळी खुप चांगल्या प्रकारे झाला.

Ø  परीक्षेचे स्वरूप ज्या प्रकारचे आहे त्या पध्दतीने अभ्यास करायलया हवा. पूर्व आणि मुख्य परिक्षा या objective type च्या आहेत. त्यामुळे अभ्यासाबरोबर जास्तीत जास्त प्रश्न सोड़वण्यावर भर असावा आणि whats app वर आणि facebook वर टाकलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून बाजारातून चांगले प्रश्नपत्रिकेचे पुस्तक खरेदी करा तर मुलाखत ही बोलण्याची परिक्षा आहे तर वाचनाबरोबर बोलण्याचा सराव महत्वाचा आहे.काही group तशा प्रकारे कार्ययत आहेत.उदा-" E MPSC 📚 पुणे".

http://ajitdc.blogspot.com/

Ø  आपण तयार केलेल्या नोटस् इतरांना द्यावयाचा नाहीत, असी एक भुमिका  काही उमेदवारांमध्ये दिसून येते त्यामुळे त्यांचे स्पर्धा विश्व हे मर्यादीत स्वरूपाचे बनते आणि ही वृत्ती त्याच्या प्रगतीच्या आड येते. परंतु whatsapp   च्या व्दारे जर अभ्यास अभ्यास वाटून केला तर तुम्हाला  ‘ GIVE & TAKE ‘ या सुत्रानुसार जर शेअर केला तर त्याचा नक्कीच फायदा होतो. उदा. जर प्रत्येकांनी 'INDIA YEAR BOOK'  मधील विषय वाटून घेतले आणि त्यावर short  मध्ये notes आणि त्या शेअर  तर अभ्यास सोपा होईल आनंदमय होईल आणि कमी वेळात अभ्यास पूर्ण करु शकाल.

Ø  सोशल मेडिया एक साधन आहे. साध्य नाही याचे भान सतत ठेवायला हवे. माझ्या मते साधारणतः दररोज 1 तासापेक्षा जास्त वेळ यासाठी  नका ठराविक दिवसातील काही वेळ यासाठी राखून ठेवा . जास्तीत जास्त  वेळ हा पुस्तकांचे चांगल्या प्रकारे वाचन आणि त्याचे चिंतन आणि प्रश्नपत्रिकाचा सराव यावर करायला हवे.

@माझे काहि लेख

MPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असा blog..कोणती पुस्तके वापरावी.अभ्यास कसा करावा.राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ साठी नियोजन कसे करावे.csat ची तयारी कसी करावी अाणि मुख्य परीक्षा चे audio notes.....खालील दिलेल्या link वर क्लिक करा

Ajitdc.blogspot.com
1)CSAT ची तयारी

2)राज्यसेवा पूर्व  परीक्षा २०१६ पुढील ४ महिने  अभ्यासाचे नियोजन कसे असावे

३)राज्यसेवा मुख्य परीक्षा audio नोट्स

4)राज्यसेवा पूर्व  परीक्षा २०१६ साठी तयारी  करणाऱ्या उमेदवारासाठी  
5)महाराष्ट्रात  होणार्या विविध स्पर्धा परीक्षा-राज्यसेवा,Forest,Agricuture,Engineerung PSI,STI,ASSISTANT, तलाठी,पोलिस,ग्रामसेवक आणि विविध  interview साठी उपयोगी "महाराष्ट्राची अार्थिक पाहणी" HIGHLIGHT स्वरूपात 

6)राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची 

#' "खुप अभ्यास करा.कधीही नाउमेद होऊ नका.जीवनात आपले चांगलेच होणार आहे ही भावना सतत मनात असु दया. जोपर्यत यश मिळत नाही तोपर्यत सातत्यपूर्ण १०० टक्के प्रयत्न करा.सोशल मेडिया चा चांगला वापर करा पण त्याच्या आहारी जाऊ नका.आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसु पाहण्यासाठी लढा."

आपला मित्र,

अजित प्रकाश थोरबोले

परि. उपजिल्हाधिकारी.
http://ajitdc.blogspot.in@या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत जर या लेखाचा वापर इतर कोणी स्वतःच्या फायद्यासाठी,स्वतः लिहले आसे दर्शवण्याचा प्रयत्न   केला तर कायदेशीर कारवाई होऊ शकते.याची नोंद असावी

Labels: ,